मराठा आरक्षणाला राष्ट्रवादीचे शरद पवार यांचाच विरोध होता: उपमुख्यमंत्री

मुंबई : मराठा आरक्षणावरून चांगलाच राजकारण तापलं आहे,अश्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या बाबतीत गंभीर आरोप त्यानी केले आहे.देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप करतांना म्हंटले कि, मराठा आरक्षणाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाच सर्वाधिक विरोध होता. शरद पवार यांनीच मराठा आरक्षणाला आतापर्यंत विरोध केलेला आहे. तसेच मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असं सुप्रिया सुळे म्हणायच्या. दोघांनाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यांना समाजाला झुंजत ठेवायचं होतं, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी असा गंभीर आरोप केला आहे. मराठा आरक्षणाला शरद पवार यांनीच विरोध केला होता. त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाच त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं असतं. पण त्यांनी फक्त मराठा समाजाला झुंजवत ठेवायचं काम केलं. लोक आपल्याकडेच आले पाहिजेत हा त्यामागचा हेतू होता. मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का असं सुप्रिया सुळे महाविकास आघाडीचं सरकार असताना म्हणायच्या, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.