मराठा वादळ मुंबईत धडकणाच! आंदोलकांचा निर्धार

मुंबई: मनोज जरांगे यांच्याकडून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण केले जाणार आहे. यासाठी जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईमध्ये मैदानाची परवानगी न मिळूनही लोणावळ्यातून मराठा समाजातील हजारो समर्थकांसह त्यांनी मुंबईकडे कूच केली आहे. नवी मुंबईमधील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केटमध्ये मराठा आंदोलकांची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी राज्यभरातून कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे. उद्या सकाळपर्यंत मुंबईमध्ये मराठा वादळ पोहोचण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी दिली नसली तरी, मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी ठाम आहेत. मात्र, आम्ही आझाद मैदानात जाऊन बसणार आहोत, आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे. जरांगे पाटील यांनी आता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे