महापरीनिर्वाण दिन ः महामानवास अभिवादनासाठी उसळला भीमसागर

भुसावळ ः शहरातील जुन्या नगरपालिकेसमोर घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी दिवसभर गर्दी झाली होती. शहर व परीसरातील विविध शाळा-महाविद्यालयात महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

श्री संत गाडगेबाबा महाविद्यालय

भुसावळ : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांनी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्राचार्य जोशी म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागळातल्या लोकांसाठी महान कार्य केले. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, डॉ.पूनम त्रिवेदी व प्राध्यापक, विद्यार्थी  ने उपस्थित होते.

प.क.कोटेचा महिला महाविद्यालय

भुसावळ ः शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात बुधवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्य्रकमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.एस.पाटील होते. हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग व समारंभ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. आय.क्यू.ए.सी. कोऑर्डिनेटर डॉ.जे.व्ही.धनवीज यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व समाजकार्य याविषयी आपले विचार मांडले. डॉ.व्ही.एस.पाटील यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. नीलेश गुरूचल तर आभार रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.जान्हवी तळेगावकर यांनी मानले. कार्यक्रमास समारंभ समितीचे प्रमुख प्रा.निता चोरडिया, विद्यार्थी विकास विभागाचे प्रा.के.सी.सूर्यवंशी, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.

भुसावळात बौध्द विकास समितीतर्फे रक्तदान शिबिर

भुसावळ ः महापरिनिर्वाण दिनानिम्मित  बौध्द विकास समितीतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जळगाव विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा.एकनाथ नेहेते यांच्या हस्ते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला ॲड.सुनील हंसराज पगारे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 140 दात्यानीं रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे आयोजन  बौध्द विकास समिती, भुसावळ यांनी रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया यांच्या मदतीने केले.

भुसावळ डीआरएम कार्यालय

भुसावळ ः डीआरएम कार्यालयात विभागीय रेल्वे व्यवस्थापक ईती पांडे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनीलकुमार सुमन, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (गती शक्ती युनिट), मुकेश कुमार मीना, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.एस.काजी आणि सीआरएमस, एनआरएमयु, एससी/एसटी असोसिएशन आणि ओबीसी असोसिएशन यासारख्या सर्व संघटना/संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही.एस. वडनेरे यांनी केले. कार्मिक विभाग, यांत्रिकी विभाग, संचालन विभाग, वाणिज्य विभाग, अभियांत्रिकी विभाग, एस.ॲण्ड टी. विभागाने परीश्रम घेतले.

दादासाहेब दे.ना.भोळे महाविद्यालय

भुसावळ ः शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे  कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.दीपक जैस्वार, डॉ.दयाघन राणे, प्रा.अंजली पाटील, प्रा.निर्मला वानखेडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे विद्यार्थी उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख डॉ.संजय चौधरी कळवितात.