सुमित देशमुख जळगाव
जळगाव : गायत्री नगर जवळ असलेल्या मेहरूण परिसर भागातील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलला लागून महापालिकेचे कचरा संकलन केंद्र आहे. या ठिकाणी रोजचा वार्डातील जमा होणारा कचरा हा घंटागाडीतून आणून वजन काट्यावर वजन केला जातो. व त्यानंतर तोच कचरा मोठ्या ट्रक मध्ये लोड केला जातो.
या प्रक्रिये मध्ये ज्या घंटागाडीत जास्त कचरा असेल तो कचरा बाजूला काढून ठेवण्यात येतो व रात्री चालणाऱ्या घंटा गाड्या ह्या केंद्रावर जाण्यासाठीचे अंतर लांब पडते म्हणून त्याच ठिकाणी त्या कचऱ्याने भरलेल्या गाड्या खाली केल्या जातात , मात्र या ठिकाणी कचऱ्याचा ढीग साचल्याने या शाळेच्या परिसरात खूप मोठी दुर्गंधी पसरलेली आहे. आणि यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र या परिसरात पाहायला मिळते. डासांचे प्रमाण देखील या भागात वाढले आहे. तसेच पाऊस चालू असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल सुद्धा झालेला आहे आणि या सर्व गोष्टींकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केलेला असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासन दरबारी याची दाखल कधी घेतली जाणार? याकडे येथील नागरिकांचे लक्ष्य लागून आहे.