महामंत्री विजय चौधरी : पंतप्रधानांचा आदर्श घेऊन कार्यकर्त्यांनी समर्पित व्हावे

फैजपूर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पक्ष व देश निष्ठेचा आदर्श ठेवून आधी देश मग पक्ष, नंतर मी या उद्देशाने काम करा. पंतप्रधानांच्या भारताला महासत्ता करण्याच्या यशात आपला ही खारीचा वाटा असू द्या व साक्षीदार न होता सहभागी होण्याची सुवर्णसंधी साधा, असे आवाहन भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी येथे केले. शुक्रवार, 27 रोजी दुपारी तीन वाजता सुमंगल लॉनमध्ये आयोजित भाजप सुपर वॉरीयर्स कार्यशाळेत ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती

भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा निखील खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत रावेर तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांच्याहस्ते करण्यात आले तसेच सुपर वॉरीयर्स यांना बुथ किट वाटप करण्यात आले. यावेळी  प्रदेश सचिव अजय भोळे, खासदार रक्षा खडसे, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, शरद महाजन, सुरेश धनके, पद्माकर महाजन, जिल्हा चिटणीस हरलाल कोळी, रावेर विधानसभा क्षेत्रप्रमुख विलास चौधरी, तालुकाध्यक्ष  राजन लासुरकर, उमेश फेंगडे आदी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक नंदकिशोर महाजन यांनी तर सूत्रसंचालन विलास चौधरी व आभार हरलाल कोळी यांनी मानले.

विधानसभेचा घेतला आढावा

रवी अनासपुरे यांनी कार्यक्रम उद्देश व बूथ रचनात्मक माहिती जाणून घेत आगामी निवडणुकांना समोर ठेवून बुथ सशक्तीकरण तसेच 21 कलमी करावयाची कार्य या संदर्भात मार्गदर्शन केले. पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून विधानसभा क्षेत्रातील स्थितीचा आढावा घेतला. जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी संघटनात्मक उहापोह मांडत रावेर विधानसभा येत्या लोकसभा निवडणुकीत 65 हजारांचे मताधिक्य देण्याची ग्वाही मान्यवरांना दिली. खासदार खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वात मतदारसंघात  ऊ वर्षात केलेल्या यशस्वी विकास कामकाज व सतत संपर्क साधल्याने भाजपाला वातावरण पोषक असल्याचा दावा केला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती

यावेळी ओबीसी प्रदेश सचिव भरत महाजन, विद्यापीठ सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, डॉ.कुंदन फेगडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अंबादास सिसोदिया, जिल्हा चिटणीस सचिन पानपाटील, महेश पाटील, हरलाल कोळी,  युवा मोर्चा सरचिटणीस राकेश फेंगडे, कृषी सभापती हर्षल पाटील, जि.प.चे माजी सदस्य सविता भालेराव, महिला तालुकाध्यक्ष रेखा बोंडे, जयश्री चौधरी,  कांचन फालक, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, मिलिंद वाघूळदे, शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, अनंता नेहेते, सरचिटणीस संजय सराफ, युवा तालुकाध्यक्ष सागर कोळीसह भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ता बंधू-भगिनी तसेच सुपर वॉरीयर्स उपस्थित होते.