---Advertisement---
नागपूर: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा बुधवारी धानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. ते योग्य निर्णय घेणार असल्याने राज्यात महायुतीचे सरकार आजही आहे आणि उद्याही राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. संत जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कायदेशीर सरकार आम्ही तयार केले आहे.
आम्हाला खात्री आहे की, आम्हाला शंभर टक्के न्याय मिळणार आहे. निकाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागला तर, त्यांच्या गटातील सर्व आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार दूर होईल. त्यामुळे सरकारला कुठलाही धोका राहणार नाही, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.