धरणगाव : जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही जागा चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करून भारताच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी साहेब विराजमान होतील. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा 5 रोजी वाढदिवस असून, तो मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येईल, असा विश्वास पी एम पाटील यांनी व्यक्त केला.
ते पुढे बोलतांना म्हणाले की, 4 जून रोजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत एनडीए ला पूर्णपणे बहुमत मिळेल व पुन्हा मोदी साहेब पंतप्रधान होतील यात तीळ मात्र शंका नाही. जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेच्या सर्वच पदाधिकारी नेते कार्यकर्ते यांनी मोठ्या उत्साहाने महायुतीच्या उमेदवारांचे काम चांगल्या पद्धतीने केले असल्यामुळे स्मिता वाघ या 100 टक्के निवडून येणार आणि 5 जून रोजी गुलाबराव पाटील साहेब यांच्या वाढदिवस महायुती तर्फे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव पाटील साहेब यांच्यावर प्रेम करणारे सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांनी 5 जून रोजी पाळधी येथे सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत व दुपारी 4 वाजेपासून शुभेच्छा देण्यासाठी यावे दुपारी 1 ते 4 कोणत्याही कार्यकर्त्यांनी येऊ नये उन्हामुळे कोणाला त्रास होऊ नये यासाठी या वेळेत येऊ नये संध्याकाळी होणाऱ्या जाहीर सभेसाठी जळगाव ग्रामीण मतदार संघातील कार्यकर्त्यांनी शक्यतो दुपारनंतर आल्यास जाहीर सभेला उपस्थित राहता येईल शक्यतो प्रत्येकाने 4 चाकी वाहनांचा उपयोग करावा जाहीर सभेनंतर उशीर होईल त्यामुळे रात्री जाताना आपल्याला त्रास होऊ नये याची काळजी सर्वांनीघ्यायची आहे वाहने सावकाश चालवायची आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी पार्किंग करताना कोणालाही त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यावी असे आवाहन जळगाव जिल्हा शिवसेना प्रवक्ते माजी नगराध्यक्ष धरणगाव पी एम पाटील यांनी केले आहे.