Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या 42 जागांवर घटक पक्षांचं एकमत झालं असून राज्यातील लोकसभेसाठी महायुतीच्या जागा जवळपास ठरल्या असल्याची मोठी बातमी समोर येतेय. महायुतीच्या 42 जागांवर घटक पक्षांचं एकमत झालं आहे. त्यामध्ये भाजप 25 जागा लढवणार असून एकनाथ शिंदे 11 जागांवर तर अजित पवार 7 जागांवर निवडणूक लढवणार हे नक्की झाल, असून केवळ सहा जागांचा तिढा सुटायचा बाकी असल्याचं समोर येतंय. ज्या सहा जागांवर चर्चा सुरू आहे त्यापैकी काही जागा या मनसेला देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
महायुतीच्या घटक पक्षांचे 42 जागांवर एकमत
महायुतीतील घटक पक्षांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट 6, भाजप 25 आणि शिवसेना शिंदे गट 11 जागांवर निवडणूक लढणार आहेत. या तीनही पक्षांनी कोणत्या लोकसभेच्या जागा लढवायच्या यावरही एकमत झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. आता केवळ सहा जागांवर बोलणी सुरू आहे.
ज्या सहा जागांवर चर्चा सुरू आहे त्यापैकी काही जागा या मनसेला देण्यात येणार आहेत. त्यामध्ये दक्षिण मुंबई या जागेचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीला मनसेचं बळ मिळाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत अधिक फायदा होण्याचा अंदाज आहे. तसेच मनसेलाही या युतीचा फायदा होणार असल्याचं दिसतंय.