लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी 20 जागांची मागणी केली आहे. यामध्ये मुंबई आणि एमएमआर परिसरातील जागांची संख्या जास्त आहे.
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण आता विधानसभा निवडणुकीसाठी मनसनेने महायुतीकडे जागांची मागणी केली आहे. मनसेने महायुतीकडे २० जागा मागितल्या आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. यामध्ये मुंबई आणि एमएमआर परिसरातील जागांची संख्या जास्त आहे.
मनसेनं महायुतीकडे कोणत्या जागा मागितल्या आहेत?
मनसेने महायुतीकडे मागितलेल्या २० जागांमध्ये वरळी, दादर माहिम, शिवडी, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, वणी, पंढरपूर, संभाजीनगर मध्य आणि पुणे या जागांचा समावेश असल्याची माहिती आहे.
वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात लढणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेचे संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. तर दादरमधून नितीन सरदेसाई आणि वर्सोवातून शालिनी ठाकरे इच्छुक आहेत.