डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे, कल्याण लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी दोन दिवसांच्या कल्याण, डोंबिवली दौऱ्यावर आले आहेत. राज ठाकरे शनिवारी कल्याण लोकसभेसंदर्भात मनसे दाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “येणाऱ्या लोकसभा आणि पुढे विधानसभा निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी म्हणून मुंबईत शाखाध्यक्षांच्या बैठका चालू झाल्या आहेत.
मनसे महायुतीत सहभागी होणार का? मनसेचे नेते महायुतीच्या व्यासपीठावर दिसतात असा प्रश्न एका पत्रकाराने राज ठाकरे यांना विचारला.व्यासपाठीवर दिसले, तिथे पाहिलं म्हणून युत्या-आघाड्या होत नसतात’ असं रोखठोक उत्तर राज ठाकरे यांनी दिलं. शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी निवडणूक चिन्हा मिळालय, त्यावर विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, ‘शरद पवारांना तुतारी चिन्ह मिळालय, त्यांनी ते फुंकाव, मी काय सांगू?’
व्होटिंग मशीन बद्दल राज ठाकरे म्हणाले
जगभरात मतदान शिक्क्यावर होतं असेल, तर आपण व्होटिंग मशीन का घेऊन बसलोय? मी मतदान केल्यानंतर ते त्याच उमेदवाराला मिळालय का? हे समजत नाही” असं म्हणत राज ठाकरे यांनी व्होटिंग मशीनला विरोध दर्शवला. महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीच राजकारण केलं जातय असही ते म्हणाले.