मुंबई : महाराष्ट्राचं मणिपूर व्हायला शरद पवारांनी हातभार लावू नये, अशी खोचक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
महाराष्ट्रात मणिपूरसारख्या दंगली घडू शकतात, अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली होती. यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये. महाराष्ट्राचं मणिपूर होऊ नये याची त्यांनी काळजी घ्यायला हवी. शरद पवारांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेलं हवंय की, नकोय?” असे ते म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणूकीवेळी राज ठाकरेंनी महायूतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. परंतू, आता विधानसभेत त्यांनी स्वबळावर निवडणूका लढण्याची घोषणा केली आहे. राज ठाकरेंनी विधानसभेची तयारीही सुरु केली असून सध्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे दौरे सुरु आहेत.