नोकरी : महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात विविध पदांसाठी नवीन मेगाभरती होणार आहे. एकूण 4539 पदांसाठी अधिसुचना जाहीर होणार असून अधिसुचना दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात येईल. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 04/12/2023 ते 18/12/2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
पदाचे नाव :
लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरती होईल.
पदाचे नाव आणि वेतनश्रेणी
लघुलेखक S-14 : 38600-122800
कनिष्ठ लिपिक S-6 : 19900-63200
शिपाई/हमाल S-1 : 15000-47600
शैक्षणिक पात्रता:
लघुलेखक (निम्नश्रेणी): (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि व मराठी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iv) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
कनिष्ठ लिपिक: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iii) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
शिपाई/ हमाल: 7 वी उत्तीर्ण व चांगली शरीरयष्टी.
(वरील शैक्षणिक पात्रता 2018 च्या भरतीनुसार आहे. यात बदल असू शकतो)