मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु होत आहे. अश्यातच निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेला एकामागे एक धक्के बसत आहेत. महिला महिन्यात माजी मुख्यमंत्री अशोच चव्हाण भाजपात गेले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. त्यानंतर बाबा सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसमध्ये सुरु असलेली हि फूट थांबत नसतांना दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. आज (दि.२२) महाराष्ट्र काँग्रेसचे माजी नेते डॉ. नितीन कोडवते आणि त्यांच्या पत्नी चंदा कोडवते यांनी महाराष्ट्र भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. लोकसभा पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कोडवते पती-पत्नीने दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. डॉ.नितीन कोडवते हे महाराष्ट्रातील गडचिरोली येथील महत्त्वाचे नेते होते.