महाराष्ट्रातील ‘या’ 7 काँग्रेस उमेदवारांची नावे जाहीर…कुणाला मिळाली संधी?

Lok Sabha Election 2024: काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत काँग्रेसकडून महाराष्ट्रातील एकूण 7 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित उमेदवारांची घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस महाराष्ट्रात 48 पैकी एकूण 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महाराष्ट्रातील 7 उमेदवारांची नावे
सोलापूर – प्रणिती शिंदे, कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती, पुणे – रवींद्र धंगेकर
नंदुरबार – गोवाल पाडवी, अमरावती – वळवंत वानखेडे, लातूर – डॉ. शिवाजी कलगे, नांदेड – वसंतराव चव्हाण