तरुण भारत लाईव्ह । ७ ऑक्टोबर २०२३। नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनने आता परतीच्या प्रवासाला सुरवात केली आहे. मुंबई, पुणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.
राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसाने माघार घेतली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. राज्यात यंदा उशिराने मान्सून दाखल झाला. दरवषी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येणारा मान्सून यंदा २५ जूनला दाखल झाला. गेल्या वर्षी मुंबईतून २३ ऑक्टोबर रोजी राज्यातून मान्सून माघारी परतला होता. राज्यातून मान्सून परत जाण्यासाठी पाच ते दहा दिवस लागतात.
१० ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यातील बऱ्याच भागातून माघारी फिरलेला असतो. १९७५ ते २०२३ या कालावधीत मान्सून परतीच्या तारखांवर नजर मारल्यास लक्षात येते कि २००५ मध्ये २ सप्टेंबर ला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला होता. त्यानंतर २००७ मध्ये ३० सेप्टेंबर ला परतीचा प्रवास सुरु झाला होता.