महाराष्ट्रात पुन्हा विजांच्या गडगडाटांसह पाऊस पडणार!

Weather Update : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत 24 ते 27 एप्रिलदरम्यान विजांच्या गडगडाटांसह पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, येत्या 2 ते 3 दिवसांत विदर्भात मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

तर, उद्या सोमवारी (दि. 24) विदर्भात काही ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्याचं देखील IMD चे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे.

दरम्यान, पुढील 5 दिवस देशातील बहुतांश भागात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हट्ले आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, ‘पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेशात आज हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सिक्कीम, ईशान्य भारताचा उर्वरित भाग, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.’ उत्तर पाकिस्तान आणि पंजाबच्या जवळील मध्य भागांवर वेस्टर्न डिस्टर्बन्स (Weather Aleart) निर्माण झालं आहे. यामुळं पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.