महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; चक्रीवादळ आणि मान्सूनची अशी आहे स्थिती

पुणे : एकीकडे मान्सूने वेग धरला असून दुसरीकडे यंदाच्या पहिल्या चक्रीवादळानेही आज रौद्ररुप घेतलं आहे. यामुळे महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये यावेळी मोठ्या लाटा उसळतील तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या किनारपट्टीवरती वादळी वार्‍यासह लाटा उसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

देशावर आज बिपरजॉय चक्रीवादळाचं सावट असणार आहे. कारण, बिपरजॉय चक्रीवादळ आज त्याचे भीषण रूप दाखवणार आहे. हे चक्रीवादळ पुढच्या २४ तासांत अत्यंत तीव्र वादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळच्या किनारी भागात जोरदार वारे आणि पावसाची शक्यता असून यामुळे काही भागात कडक हवामान असण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर नैऋत्य मान्सून आता कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे, ईशान्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे, ईशान्येकडील राज्यांमध्येही येत्या दोन दिवसांत मान्सूनचा पाऊस पडेल. आयएमडी नुसार, उत्तर पश्चिम भारतात जूनच्या चौथ्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाची परिस्थिती निर्माण होत आहे.

हवामान खात्याकडून आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातल्या मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी भागामध्ये या चक्रीवादळाचा परिणाम होणार असून गुजरातलाही या चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये यावेळी मोठ्या लाटा उसळतील तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या किनारपट्टीवरती वादळी वार्‍यासह लाटा उसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढील तीन दिवसांत केरळ आणि किनारपट्टीवर कर्नाटकात मुसळधार पाऊस पडेल, तर लक्षद्वीपमध्ये पुढील दोन दिवसांत अशीच स्थिती राहील. एकंदरीत, पुढील आठवड्यात प्रदेशात गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, रविवार ते मंगळवार उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये जोरदार पाऊस पडेल. अंदमान आणि निकोबार बेटांवर शनिवार ते रविवार भरपूर पाऊस पडेल.