मुंबई : देशाच्या विविध भागांसाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला असून, पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांमध्ये कुठे मध्यम स्वरूपाचा तर कुठे गारपिटीसह मुसळधार पाऊस आणि बहुतांश ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवली आहे. अलिकडेच मोठा विध्वंस करून गेलेल्या मिचॉन्ग चक्रीवादळाचा देशाच्या हवामानावर परिणाम आणखी काही दिवस दिसून येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे.
आजही अनेक ठिकाणी पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्र आणि लगतच्या मालदीव परिसरात चक्रीवादळामुळे पुढील चार ते पाच दिवस केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लक्षद्वीपमध्ये विजाच्या कडकडाटासह पाऊस पडेल. याशिवाय, अंदमान-निकोबार बेटे, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, उप- हिमालय, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेशची किनारपट्टी या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज पश्चिमेकडून वाहणाऱ्या चक्रीय वाऱ्यामुळे पश्चिम हिम लियीन प्रदेशावर परिणाम दिसून येणार आहे. यामुळे जम्मू-काश्म ीर, लडाख, गिलगिट- बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी तसेच पावसाची शक्यता आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट
सोमवारपासून देशाच्या विविध भागांत किमान तापमानात घट होईल. उत्तर भारतात थंडी वाढणार आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानात २ ते ३ अंशांची घट होईल. सोबतच धुक्याची चादरही दिसेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे