---Advertisement---

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २६६ जागांसाठी भरती; कसा कराल अर्ज?

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । ६ सप्टेंबर २०२३। प्रत्येकाला चांगलं शिकून पुढे चांगली नोकरी करायची असते. त्यासाठी प्रत्येक जण हा प्रयत्न करत असतो. त्यातूनच स्पर्धा परीक्षाची तयारी करण्यासाठी एक खुशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 266 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज कसा करायचा तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे हे सर्व जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

शैक्षणिक पात्रता व रिक्त पदाचे नाव
१] सहाय्य्क प्राध्यापक, महाराष्ट्र अभीयांत्रिकी गट अ १४९, शिक्षक सेवा गट या साठी प्रथम श्रेणी B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S ही शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे.

२] सहाय्य्क प्राध्यापक, शासकीय फार्मसी महाविद्यालय, महाराष्ट्र अभीयांत्रिकी शिक्षक सेवा गट अ ०६, यासाठी शैक्षणिक पात्रता प्रथम श्रेणी B.Pharm & M.Pharm

३]वैद्यकीय अधीक्षक MCGM गट अ ०३ यासाठी शैक्षणिक पात्रता MBBS व रुग्णालय प्रशासन PG डिप्लोमा\पदवी

४] सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभीयांत्रिकी शिक्षक सेवा गट अ १०८ यासाठी शैक्षणिक पात्रता हि Ph.D. प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य. SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने. 08 वर्षे अनुभव

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी,19 ते 50 वर्षे असावे [मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/अनाथ 05 वर्षे सूट] तसेच अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २५ सप्टेंबर २०२३ अशी आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment