मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज 18 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेशासह सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक अशा निर्णयांचा समावेश आहे.