महावितरणचा ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक ; आजपासून नवे दर लागू

मुंबई : जर तुम्हीही महावितरणचे वीज ग्राहक असाल तर तुम्हाला झटका देणारी एक बातमी आहे. आजपासून महावितरणच्या वीज दरात वाढ  करण्यात आली आहे. वीज बिलात सरासरी 7.50 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहे.

एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना महावितरणच्या वीजग्राहकांना आज म्हणजेच 1 एप्रिलपासून वीजदरवाढीचा शॉक बसणार आहे.  आजपासून वीजबिलात सरासरी 7.50 टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही 10 टक्के दरवाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणकडून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर १ एप्रिल २०२४ पासून राज्यातील महावितरणच्या सर्व ग्राहकांचा स्थिर आकार वाढणार आहे. यात इंधन अधिभार जोडल्यास ग्राहकांवर सुमारे १० टक्के दरवाढीचा बोजा पडण्याचा अंदाज आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या मार्च २०२३ रोजीच्या आदेशानुसार ही दरवाढ होत आहे.

त्यानुसार १ एप्रिल २०२३ च्या तुलनेत १ एप्रिल २०२४ पासून सर्वच संवर्गातील ग्राहकांचा स्थिर आकार वाढेल. घरगुती संवर्गातील सिंगल फेससाठी पूर्वी ११६ रुपये लागायचे. आता १ एप्रिल २०२४ पासून १२८ रुपये लागतील. थ्री फेससाठी पूर्वीच्या ३८५ रुपयांऐवजी ४२५ रुपये लागतील.