महिला आयोगाच्या जनसुनावणीत 94 प्रकरण दाखल ; तीन पॅनल कडून कार्यवाही

जळगाव :  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत नियोजन भवन येथे आज जनसुनावणी झाली. एकूण 94 प्रकरण दाखल झाली होती. तीन पॅनल कडून कार्यवाही करण्यात आली.

आज जळगाव जिल्ह्याची जनसुनावणी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली. जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे झालेल्या सुनावणीला पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित ,महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सय्यद , जिल्हा महिला बालविकास अधिकारी वनिता सोनगत  उपस्थित होते.

एकाचवेळी तीन पॅनल तयार करून आजच दाखल झालेल्या एकूण 94 प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. कौटुंबिक छळ, पोलिसांकडून झालेले दुर्लक्ष, प्रशासकीय अडचणी अशा स्वरूपाच्या केसेस आज सुनावणीला आल्या होत्या.

त्यात वैवाहिक/कौटुंबिक समस्या -74 ,सामाजिक -7, मालमत्ता/आर्थिक/ समस्या – 3, इतर -10 असे एकूण 94 प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर 18 व 19 सप्टेंबर  जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. 18 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्यासमोर जिल्ह्यातील विविध विभागाचा आढावा दिला होता.