उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात डोंगरावर खाणकाम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली. खाणकाम सुरू असताना अचानक डोंगराचा एक भाग कोसळून सुमारे १५ मजूर खाणीत पडले. या अपघातात जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत चार मजुरांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे, तर दोघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर पोकलँड मशीनसह तीन ट्रॅक्टर अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत. प्रशासन खबरदारीचा उपाय म्हणून दोन पोकलँड मशीन लावून आणि ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुरांचा शोध घेऊन बचावकार्यात गुंतले आहे.
महोबात मोठी दुर्घटना, ब्लास्टिंगमध्ये 4 मजुरांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली
Updated On: एप्रिल 29, 2024 11:07 am

---Advertisement---