माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी निवडणूक लढविण्यासंदर्भातील घेतला ‘हा’ निर्णय 

आगामी काळात आपण निवडणूक लढविणार नसल्याचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आ आहे. त्यांनी पुढे सांगितले की, विधानपरिषदेतील माझा 5 वर्षांचा कालावधी बाकी आहे. मी जरी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी मी राजकारणातून निवृत्त झालो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रविवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे यांनी विविध अशा अनेक विषयांवर आपले मत मांडले. पुढची विधानसभा निवडणूक तुम्ही लढवणार का ? असे विचारल्या असता खडसे म्हणाले, ईथून पुढे मी कोणतीही निवडणूक लढवण्यास ईच्छुक नाही.  कारण मी आणखी 5 वर्षांसाठी विधान परिषदेचा आमदार असणार आहे. आणि शरद पवार साहेबांनी सांगितले आहे की, ते एकदा दिलेली गोष्ट परत मागत नाहीत. त्यामुळे पवार साहेबांनीच मला अभय दिला असल्यामुळे दुसऱ्या कोणी राजीनामा मागितल्याने मला काही फरक पडत नाही.