तरुण भारत लाईव्ह । १० सप्टेंबर २०२३। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज जळगावात येत आहे. महापालिकेच्या प्रांगणातील सरदार वल्ल्भभाई पटेल आणि प्रिंप्राळा येथील छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करायचे यावरून गेले काही दिवस चाललेल्या वादात भाजपाने एक पाऊल मागे घेतले आहे. तर ठाकरे गटाच्या महापौर जय श्री महाजन यांनी पुतळ्याचे अनावरण रविवार दिनांक १० सप्टेंबरला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले.
दरम्यान भाजपाने एक पाऊल मागे घेतले आणि या कार्यक्रमाला आमचा विरोध नसल्याचे पक्षाचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होण्यासाठी भाजपाची आग्रही भूमिका होती तर महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील आणि ठाकरे सदस्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यावर ठाम होते. यावरून वाट चालला होता त्यावर शुक्रवारी पोलिसांच्या दरबारात देखील तोडगा निघू शकला नव्हता
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी सकाळी ११ वाजता जळगाव विमानतळावर येतील त्यांच्या हस्ते अकरा वाजून दहा वाजता मनपात अकरा वाजता साडेअकरा वाजता प्रिंप्राळा येथे पुतळा अनावरण होईल दुपारी बारा वाजता जाहीर सभेला संबोधित करतील.