माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह बॉलिवूड अभिनेत्यांनीही बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवार, २० रोजी ६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 49 संसदीय मतदारसंघांमध्ये मतदान होत  आहे.मतदानाला सकाळी ७ वाजेपासून  प्रारंभ झाला असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत  ते चालणार आहे.

 

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर, आर्चीजच्या दिग्दर्शिका झोया अख्तर आणि उद्योगपती अनिल अंबानी हे सोमवारी मुंबईतील सुरुवातीच्या मतदारांमध्ये होते. मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागांसाठी- मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य– सध्या मतदान सुरू आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनीही मतदान केले. गायक कैलाश खेर, यांनी मतदान केले. शिवसेना नेते गोविंदा तसेच अभिनेता-उद्योजक सुनील शेट्टी देखील मुंबईत मतदान करताना दिसले. भाजपचे उत्तर लोकसभेचे उमेदवार पीयूष गोयल, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आयुक्त भूषण गगराणी आणि शिवसेना ठाकरे गटाचे  लोकसभेचे मुंबई दक्षिणचे उमेदवार अरविंद सावंत हे देखील सुरुवातीच्या मतदारांमध्ये होते. गीतकार गुलजार आणि त्यांची मुलगी चित्रपट निर्माती मेघना गुलजार यांनाही मुंबईतील वांद्रे येथील मतदान केंद्रावर मतदान करताना दिसले. परेश रावल, जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा, श्रिया सरन, चित्रपट निर्माते कुणाल कोहली, कुस्तीपटू संग्राम सिंग, शाहिद कपूर आणि अनिता राज हे देखील मतदानासाठी आलेले होते. “मत न देणाऱ्यांसाठी काही तरतुदी असायला हव्यात, जसे की कर वाढवणे किंवा इतर काही शिक्षा,” रावल यांनी मतदान केल्यानंतर सांगितले.