---Advertisement---

माजी राज्यपाल पुन्हा राजभवनात!

by team
---Advertisement---

मुंबई : राज्याचे वादग्रस्त माजी राज्यापाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा राजभवनात दिसणार आहेत. राज्याच्या ६ दिवसाच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचे नुकतेच डेहराडून येथून मुंबईत आगमन झाले आहे. भगतसिंग कोश्यारी राजभवनात यांचे १६ ते २१ मे दरम्यान वास्तव्य असेल. तर १७ मे ते २० मे दरम्यान आपल्या नियोजित कार्यक्रमांमध्ये व्यस्त राहणार आहेत. या दौर्‍या दरम्यान, भगतसिंग कोश्यारी हे डॉक्टरांची देखील भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांनी विविध स्वरूपाचे वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांचा मुद्दा उपस्थित करत विरोधकानंी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, कोश्यारी यांनी देखील राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सुप्रीम कोर्टाने सत्तासंघर्षाच्या निकालात तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले होत. या निकालानंतर प्रथमच महाराष्ट्र दौरा आहे. या कालावधीत ते सहा दिवस विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment