बोदवड : शहरात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका २७ वर्षीय तरुणीचा ‘माझ्यासोबत प्रेम कर नाही तर मी विष घेईल’ अशी धमकी देत विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी तरुणीने पोलिसांत फिर्याद दिली असून संशितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहरातील एका भागात २७ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. संशयीत मोहन सुनील मुंढे (लपाली, ता.मोताळा) याने 3 फेब्रुवारी रोजी पीडीतेचा पाठलाग करीत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पीडीतेला ईशारा करुन हातवारे केले आणि थांब आपण कुठेतरी बाहेर जाऊ, असे सांगितले. शिवाय तु माझ्यासोबत प्रेम केले नाही तर मी विष घेऊन मरून जाईल व तुझे नाव घेईल, अशी धमकी दिली.
या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सदर संशिय आरोविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाईक शशिकांत भिवा शिंदे करीत आहेत.