इंदापूर : भाजपाचे मित्रपक्षच आपल्या शिवीगाळ करीत असल्याचे भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे. माझ्या जीवाला धोका आहे. मला मतदारसंघात फिरू न देण्याची धमकी दिली जात आहे, असा आरोप पाटिल यांनी केला आहे.
महायुतीतील मित्रपक्षाचे तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी मतदारसंघातील जाहीर सभांमधून आम्हाला धमकी देत आहेत. मला मतदारसंघात फिरू देणार नाही . घराबाहेर पडू देणार नाही, अशी धमकी दिली जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे पत्र उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.