एक व्यक्ती पोटदुखीने त्रस्त होती. त्याला वारंवार जुलाब होत होते. सुरुवातीला त्या व्यक्तीला अन्नातून विषबाधा झाली असावी, असे वाटले. मात्र औषधे घेऊनही आराम न झाल्याने ते थेट रुग्णालयात गेले. पण जेव्हा डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा अल्ट्रासाऊंड केला तेव्हा आतील भाग पाहून ते थक्क झाले. कारण, त्यांच्या पोटात असे काही दिसले की ते तिथे कसे पोहोचले? हे प्रकरण व्हिएतनामचे आहे.
ऑडिटी सेंट्रलच्या म्हणण्यानुसार, 34 वर्षीय व्यक्ती पोटदुखीची तक्रार घेऊन 20 मार्च रोजी निन्ह प्रांतातील रुग्णालयात गेला, जिथे डॉक्टरांनी त्याची प्रकृती पाहून ताबडतोब त्याला दाखल केले. पण जेव्हा त्यांनी त्या व्यक्तीचे अल्ट्रासाऊंड आणि एक्स-रे केले तेव्हा अहवाल पाहून त्यांना धक्काच बसला. कारण, त्याच्या पोटात काही प्राणी अडकले होते. यानंतर त्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता तो पूर्णपणे बरा आहे.
डॉक्टरांनी त्या माणसाच्या पोटातून 30 सेमी लांब जिवंत ईल काढल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिवस पोटात राहूनही इलचा मृत्यू झाला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खरे तर पोटाच्या आतल्या हालचालीमुळे रुग्णाला असह्य वेदना होत होत्या. रिपोर्टनुसार, जिवंत ईलने रुग्णाच्या आतड्यात छिद्र केले होते, त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्रावही होत होता. आणखी एक-दोन दिवस वाट पाहिली असती तर त्याचा मृत्यू झाला असता, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.डॉक्टरांनी सांगितले की आतड्यांतील संसर्ग बरा करण्यासाठी नेक्रोटिक रेक्टम कापून वेगळे केले.