लखनौ: सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे. उत्तरप्रदेशात तर प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचाराच्या मालिकेत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नगीना भागात पोहोचले. तेथे त्यांनी भाजपा उमेदवार ओम कुमार यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी सपा, बसपा आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. माफिया मुख्तार अन्सारीच्या घरी जाऊन शोक व्यक्त करणाऱ्या नेत्यांचा त्यांनी चांगलाच समाचार जाऊन फातिहा वाचतात, पण जरघेतला. योगी आदित्यनाथ म्हणाले की, सपा, बसपा आणि काँग्रेस पक्षाचे लोक माफिया आणि गुन्हेगारांच्या घरी एखादा निष्पाप हिंदू अपघातात बळी ठरला, तर त्यांच्या तोंडून दुःखाचा एक शब्दही निघत नाही. हे लोक माफियांचा गौरव करतात.
माफियाच्या दारी नेत्यांची फेरी
उल्लेखनीय म्हणजे माफिया मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर अनेक बडे नेते त्याच्या गाझीपूर येथील घरी शोक व्यक्त करण्यासाठी गेले होते. या नेत्यांमध्ये अखिलेश यादव, ओवेसी आदी नेत्यांचाही समावेश होता. अशा नेत्यांवर मुख्यमंत्री योगींनी निशाना साधला. ते म्हणाले की, सपा, बसपा आणि काँग्रेसच्या काळात राज्यात दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी दंगली होत होत्या, ज्याचे पश्चिम उत्तर प्रदेश साक्षीदार आहे. त्याचबरोबर भाजपाच्या डबल इंजिन सरकारने विकासाबरोबरच कायदा व सुव्यवस्था उत्कृष्टपणे सांभाळली आहे