---Advertisement---

मामाच्या मुलीसाठी सख्ख्या भावांत हाणामारी, अन् ती म्हणाली माझे…!

by team
---Advertisement---

जामनेर: शहरात चित्रपटाला शोभेल अशी घटना समोर आली आहे. मुलगी पाहण्यासाठी आईसोबत दोन्ही भाऊ गेले असतांना. मुलगी पसंत पडल्याने मोठ्या मुलाने होकार दिला.  पण लहान भावालादेखील मुलगी पसंत असल्याने त्याने चक्क तिच्यासोबतच लग्नाची इच्छा व्यक्त केली. यावरून सख्ख्या भावांत हाणामारी झाली.पण मुलीने गल्लीतील एका मुलावर प्रेम असल्याचे सांगत सर्वांना धक्काच दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, बाहेरच्या राज्यातील रहिवासी असलेली बहीण शनिवारी जामनेरातील आपल्या भावाकडे मुलगी पाहण्यासाठी आली. सोबत तिची दोन तरुण मुलेही होती. बहिणीने मोठ्या मुलासाठी भावाकडे मुलीची मागणी घातली. मोठ्या मुलाला मुलगी पसंत पडली.

इकडे लहान मुलाने आपणासही मामाची मुलगी पसंत असल्याचे सांगत तिच्याशी लग्न करायचा हट्ट धरला. यावेळी उपस्थित नातेवाइकांनी लहान भावाला समजावले; पण तो हट्टालाच पेटला. दोन्ही भावांत वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

इकडे मुलीने मात्र दोघांपैकी कुणाशीच आपल्याला लग्न करायचे नाही. आपले गल्लीतील एका तरुणावर प्रेम आहे. त्याच्याशी मी लग्न करणार असल्याचे सांगत सर्वांनाच धक्काच दिला. मुलीचा निर्णय ऐकून पाहुणी म्हणून आलेली बहीण दोघा मुलांसोबत आपल्या गावाकडे परतली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment