मारहाण करून दोघा भावांना लुटले रिक्षाचालकासह साथीदार पसार

जळगाव :  रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने दमदाटी करत मारहाण केली. तसेच दोघा भावांच्या खिशातून पाच हजाराची रोकड काढून उघेतली. रविवार, १० रोजी रात्री १२.१५ वाजता ही घटना खेडी पेट्रोलपंपाजवळ घडली. याप्रकरणी सोमवार, ११ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नीलेश रामलाल शिलाले (वय १९, रा. रामटेक म.प्र., ह.मु. रायपूर, ता.जळगाव) हा भावासह खेडी पेट्रोलपंपाजवळ उभे होते.

महामार्गावरुन येत असलेली प्रवासी रिक्षा शिलाले बंधूजवळ थांबली. रिक्षाचालक तसेच त्याच्या एका साथीदाराने नीलेश तसेच त्याच्या भावाच्या खिशातून जबरीने पैसे काढण्याचा प्रयत्न केला. याला विरोध करताच शिलाले बंधूना चालकासह साथीदाराने मारहाण करत दमदाटी केली. त्यानंतर खिशात हात टाकून पाच हजाराची रोकड काढून आदर्श नगर, पोलीस उपनिरीक्षक ऑफिस , जळगाव, ता. जि.जळगांव नीलेश गोसावी करीत आहेत.