मुंबई : देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन नुकताच देशभरात उत्साहात साजरा झाला. ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेलाही देशवासीयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मात्र तिरंगा ध्वज फडकवला म्हणून धमकी देत त्यावर आक्षेप घेतल्याचा प्रकार मालाड-मालवणी परिसरात घडला आहे. सुखशांती सेवा संघ, मालाड (प) येथे राहणाऱ्या नाजिया अंसारी या महिलेने त्यांच्या राहत्या ठिकाणी ध्वज फडकावल्याच्या रागातून तो उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी नाजिया अंसारी यांच्याविरोधात मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर बोर्ड २००६ पासून त्या जागेवर लागला आहे. येथील माजी अध्यक्ष अब्दुल कादिर अंसारी कमिटीवर असताना सर्वानुमते बोर्ड लावण्यात आला होता. त्यानंतर याच ठिकाणी रहिवासी एकत्र येऊन स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करू लागले. मात्र अब्दुल अंसारी कमिटीवरून गेल्यानंतर त्यांचे कुटुंबीय हे दोन दिवस साजरा करण्यात अडथळा आणत आहेत. रहिवाशांनी शिविगाळ करत, धमकी देत अंसारी यांची सून नाजिया अंसारी (नंदू) आणि मुलगा रहमान अंसारी याठिकाणी ध्वजारोहण करण्यावर आक्षेप घेत आहेत. “बोर्ड आणि झेंडा स्वतःच्या घरी जाऊन लाव; असे म्हणत अर्वाच्च भाषेत नाजिया अंसारी यांनी उपस्थितांना शिवीगाळ केल्याचे स्थानिक रहिवाशी ममता गुप्ता यांनी सांगितले. त्यामुळे नाजिया अंसारी यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी उचित कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.