यावल ः आमोदा येथील माहेर असलेल्या 25 वर्षीय विवाहितेचा बटाईने शेती करण्याकामी माहेरून एक लाख रुपये आणावेत या मागणीसाठी पतीसह नऊ जणांनी तिचा छळ केला. पैसे आणले नाही म्हणून तिला शारीरीक त्रास देऊन माहेरी सोडून दिले. याप्रकरणी फैजपूर पोलिसात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आमोदा, ता.यावल येथील माहेर असलेल्या आशाबाई अनिस तडवी (25) या विवाहितेने फैजपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा विवाह ऑगस्ट 2023 मध्ये कासारखेडा, ता.यावल येथील अनिस शब्बीर तडवी यांच्यासोबत झाला होता.
विवाहानंतर पती अनिश शब्बीर तडवी, शब्बीर बलदार तडवी, आशाबाई शब्बीर तडवी, मुमताज शब्बीर तडवी, नजमा राजू तडवी, जरीना शब्बीर तडवी, कबीर शब्बीर तडवी, शरीफ तडवी व पिंटी शरीफ तडवी या नऊ जणांनी तिला माहेरून शेती बटाईने करण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणून तिचा छळ केला व पतीने दारूच्या नशेत तिला मारहाण केली. शिवीगाळ करून माहेरी सोडून दिले. नऊ संशयितांविरोधात फैजपूर पोलिसात विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रभाकर चौधरी करीत आहें.