---Advertisement---

मिचेल स्टार्क आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू

by team
---Advertisement---

दुबई: आगामी सोळाव्या इंडियन प्रीमियर लीग हंगामासाठी येथे पार पडलेल्या आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी २४ कोटी ७५ लाख रुपयांत खरेदी केले. ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला मागे टाकत स्टार्क महागडा खेळाडू ठरला. सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सला २० कोटी ५० लाख रूपयांत खरेदी केले. या लिलावात विदर्भाच्या स्टार वेगवान गोलंदाज उमेश यादव व शुभम दुबे या दोन खेळाडूंचे नशीब फळफळले आहे. भारतीयांमध्ये हर्षल पटेल सर्वात महागडा खेळाडू ठरला असून, पंजाब किंग्सने हर्षलला ११.७५ कोटी रुपयांमध्ये मिळवून आपल्या संघात दाखल करून घेतले. हर्षलची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment