मिशन राणीगंज’ हा चित्रपट ऑस्करसाठी घोषित

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मागच्या काही दिवसांपासून त्याच्या आताच प्रदर्शित झालेल्या ‘मिशन राणीगंज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता अक्षय कुमारच्या प चित्रपटांच्या यादीत मिशन राणीगंजचे नावही सामील झाले आहे. अक्षयसोबतच निर्मात्यांनाही या चित्रपटाकडून खुप अपेक्षा होत्या.पण चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट काही  विशेष करू शकला नाही.

या चित्रपटामध्ये  परिणीती चोप्रा ही मुख्य भूमिकेत होती.मिशन राणीगंज फ्लॉप झाल्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी  राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त मोठी घोषणा केली आहे. अक्षय कुमारच्या मिशन राणीगंजला ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. निर्माते हा चित्रपट ऑस्कर सोहळ्यात सादर करणार आहेत. मिशन राणीगंजपूर्वी आरआरआरच्या निर्मात्यांनीही असेच पाऊल उचलले होते. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे.चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर मिशन रंगंजने आतापर्यंत केवळ 20.8 कोटींचा व्यवसाय केला आहे.