पुणे: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे यांची आज पुन्हा एकदा भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ पोहचले आहेत. मात्र, शिष्टमंडळासोबत कोणतेही चर्चा झालेली नाही. आपण आधी आंदोलकांशी चर्चा करणार आहोत, त्यानंतरच सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. तर मराठा समाजासोबत झालेल्या चर्चेनंतरच पुढील निर्णय़ घेणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
दरम्यान आज शिष्टमंडळ माझ्या भेटीसाठी आले होते.. परंतु, आमची कोणतेही चर्चा शिष्टमंडळाशी झालेली नाही. मी आधी आमच्या आंदोलकांशी चर्चा करणार आहोत. आमची चर्चा झाल्यावर शिष्टमंडळ यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आमच्या वाहनांचे तोंड मुंबईकडे करून ठेवले जाणार आहे. निर्णय झाल्यावर आम्ही पुढे जाणार नाही. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही, असेही जरांगे म्हणाले आहेत.