---Advertisement---

मुंबई : पालिकेचा निष्काळजीपणा, दोन चिमुकल्यांनी गमावला जीव, नेमकं काय घडलं ?

by team
---Advertisement---

मुंबई : महापालिकेच्या उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुकल्यांनी आपला जीव गलावल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. हे दोन्ही चिमुकले रविवारपासून बेपत्ता होते. मुलं बेपत्ता असल्याने कालपासून त्यांचा शोध सुरु होता. अखेर ते आज या पाण्याच्या टाकीत आढळून आले. पालिकेचा निष्काळजीपणावर कुटुंबासमवेत परिसरातील लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मृत चिमुकले हे दोघे भाऊ असल्याची माहिती आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. करण (वय ४ वर्षे) आणि अंकुश (वय ६ वर्षे) अशी मुलांची नावे असून दोघे भाऊ असल्याची माहिती आहे. महर्षी कर्वे गार्डन येथील पाण्याची टाकी पातळ प्लास्टीकने झाकून ठेवलेली होती. त्यामुळे करण आणि अंकुश हे या पाण्याच्या टाकीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment