भुसावळ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एप्रिलपासून उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात, क्र. ०१०५३ लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस साप्ताहिक विशेष गाडी ३ एप्रिल ते २६ जूनपर्यंत प्रत्येक बुधवारी मुंबई येथून १२:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४:०५ वाजता बनारस पोहचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, ज्योनाथपूर आणि वाराणसी असे थांबे असतील. क्रमांक ०१४०९ लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर द्विसाप्ताहिक विशेष गाडी १ एप्रिल ते २९ जूनपर्यंत सोमवार आणि शनिवार रोजी मुंबई येथून १२:१५ वाजता सुटेल. टर्मिनस समस्तीपूर साप्ताहिक विशेष गाडी ४ एप्रिल ते २७ जूनपर्यंत प्रत्येक गुरुवारी मुंबई येथून १२:१५ वाजता सुटेल
क्र. ०१०४५ लोकमान्य टिळक टर्मिनस प्रयागराज साप्ताहिक विशेष गाडी २ एप्रिल ते २५ जूनपर्यंत प्रत्येक मंगळवारी मुंबई येथून १२:१५ वाजता सुटेल. या गाडीला कल्याण, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना आणि माणिकपूर इथे थांबे असतील. क्र. ०११२३ लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर साप्ताहिक विशेष गाडी ५ एप्रिल ते २८ जूनपर्यंत प्रत्येक शुक्रवारी मुंबई येथून २२:१५ वाजता सुटेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई, ओराई, कानपूर, लखनौ, बाराबंकी, गोंडा आणि बस्ती या ठिकाणी थांबे असतील