मुंबई: लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीत मनसेला दोन जागा मिळण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. दिल्लीतील बैठकांच सत्र संपल्यानंतर मुंबईत बैठकांच सत्र सुरु आहे. मुंबईतील वांद्रे येथील हॉटेल ताज लँडस एँड येथे राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे विविध लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुरु असलेल्या बैठकीनंतर राज ठाकरे काही लोकसभा मतदारंसघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याच माहिती आहे. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना बोलावणं पाठवलं असून मनसेचे पदाधिकारी मुंबईत दाखल होत आहेत. नाशिकच्या अनेक पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी बोलावून घेतलं आहे.