मुंबई सेंट्रल भुसावळ एक्सप्रेसला मुदतवाढ देण्याची यांची मागणी

जळगाव : खान्देशातील प्रवाशांच्या समस्या लक्षात घेता धरणगाव व अमळनेर रेल्वे सल्लागार समिती व मेंबर व तमाम खान्देशातील जनता यांच्या मागणीला प्राधान्य देत खासदार उन्मेश पाटील यांना मुंबई सेंट्रल भुसावळ एक्सप्रेस (०९०५१/५२) ही गाडी कायमस्वरूपी/मुदत वाढवून मिळावी यासाठी पत्राद्वारे निवेदन देण्यात आले. पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल भुसावल एक्सप्रेस ही गाडी जानेवारीत ३ महिने प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. त्या गाडीला खानदेशातून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

ही गाडी ७ जानेवारीला सुरू झाली व ती १ जानेवारी २०२४ पर्यंत धावणार आहे. विशेष म्हणजे धरणगाव व अमळनेर येथून मुंबई जाण्यासाठी दररोज शुक्रवार वगळता सायंकाळी ७ वाजता गाडी आहे. खान्देश एक्सप्रेस-३ दिवस व मुंबई सेंट्रल भुसावल एक्सप्रेस-३ दिवस गाडी धावते. खानदेशातील तमाम तसेच धरणगावातील नागरिकांच्या प्रतिसाद व मागणीनुसार धरणगाव व अमळनेर रेल्वे सल्लागार समितीची सदस्य व झेडआरयुसी मेंबर यांनी मुंबई सेंट्रल भुसावळ ही गाडी कायमस्वरूपी/मुदत वाढवून मिळावी, असे निवेदनात म्हटले आहे.