मुकेश अंबानी : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी याना गेल्या दोन दिवसा आधी धमकीचा फोन आला होता.आता दोन होत नाही तो पर्यंत त्यांना परत एकदा धमकीचा मेल आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ईमेल आला आहे, ज्यामध्ये 400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी या संदर्भात माहिती दिली आणि सांगितले की अंबानींच्या कंपनीला सोमवारी हा ईमेल प्राप्त झाला. चार दिवसांत मुकेश अंबानींना पाठवलेला हा तिसरा धमकीचा ईमेल आहे. यापूर्वी, शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने पहिला ईमेल पाठवल्यानंतर अंबानींच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे गमदेवी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. या ईमेलमध्ये 20 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. शनिवारी कंपनीला 200 कोटी रुपयांची मागणी करणारा आणखी एक ईमेल आला होता.
धमकीबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी कंपनीला तिसरा ईमेल पाठवण्यात आला होता. ज्या व्यक्तीने हा ईमेल पाठवला त्याने ही रक्कम दुप्पट केली. मुंबई पोलीस, गुन्हे शाखा आणि सायबर टीम तपासात गुंतली आहे. ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी बिहारमधील दरभंगा येथून एका व्यक्तीला मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल केल्याप्रकरणी अटक केली होती. आरोपींनी मुंबईतील ‘सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल’मध्ये बॉम्ब टाकण्याची धमकीही दिली होती. जर तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम नेमबाज आहेत.