मुक्ताईनगर : लोकसभा निडणुकीत रावेर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाकडून तिसऱ्यांदा खा.रक्षाताई खडसे यांना संधी दिली आहे. त्यांनी आपल्या प्रचाराला प्रारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार, २ रोजी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे हेलिकॉप्टरने मुक्ताईनगरात दाखल झाले आहेत. याप्रसंगी त्यांचे स्वागत महायुतीचे उमेदवार खा. रक्षाताई खडसे यांनी पुष्पगुच्छ देवून केले.यानंतर संत मुक्ताई साखर कारखाना येथे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, माजी आ.नसुख संचेती, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय समन्वयक राजेंद्र फडके, अमोल जावळे, डॉ. केतकी पाटील, अशोक कांडेलकर, प्रफुल्ल जवरे, मनोज बियाणी आदी उपस्थित होते.