मुख्यमंत्री आज जळगाव दौऱ्यावर; ५० किमी साठी निवडला हवाई मार्ग, काय आहे कारण?

तरुण भारत लाईव्ह । १२ सप्टेंबर २०२३। राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन पुन्हा भेटले असून मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्यात येत आहेत संभाव्य दौऱ्यानुसार ते विमानाने जळगावला येतील आणि येथून हेलिकॉप्टरने पाचोराकडे रवाना होतील त्यांनी तीस किलोमीटर अंतरासाठी हवाई मार्ग निवडला त्याची जनतेत चर्चा सुरू झाली.

आंदोलनाच्या भीतीमुळे रस्त्याने प्रवासस्थान टाळला जात असल्याचे म्हटले जात आहे तर पाचोराचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी या चर्चेत तथ्य नसल्याचा दावा केला आहे शासन आपल्या दारी या तालुकास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचा संभाव्य दौरा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार ते जळगावला विमानाने येणार असून विमानतळावरूनच हेलिकॉप्टरने पाचोराला रवाना होणार आहे. त्यांना रस्त्याने जाण्याचा पर्याय उपलब्ध होता मात्र त्यात विचार करण्यात आलेला नाही अशात मराठा आंदोलन पुन्हा एकदा भेटले असून त्यांचा संदर्भ मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील नियोजनाची जोडला जात आहे.

कोणतीही रिक्स नको म्हणून विमानतळावरूनच  पाचोऱ्यात जातील रस्त्याने गेले असते तर त्यांना अर्धा तास लागला असता पण संपूर्ण मार्गावर बंदोबस्त ठेवण्याची कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतर्क राहण्याचे मोठे काम पोलिसांना करावे लागले असते हवाई मार्ग म्हटला म्हणजे हा ताण हलका होणार आहे. अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्र्यांना जळगावहून हेलिकॉप्टरने यायला दहा ते पंधरा मिनिटे लागतील यामुळे वाहतुकीचा प्रश्न उद्भवणार नाही निवेदन देण्यास व भेटण्यास इच्छुक नसतील. रस्त्याने आले असते तर अर्धा तास लागला असता वेळ वाचावा म्हणून ते हेलिकॉप्टरने येत आहे मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे असेही आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.