मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठा पक्षाला आणखी एक धक्का दिला आहे. मुंबई विमानतळावरील भारतीय कामगार सेना युनियनवर शिवसेना उबाठाचे वर्चस्व आहे. ते वर्चस्व मोडून काढण्यासाठी सूत्र एकनाथ शिंदे यांनी हातात घेतली आहे.
शिवसेना कोणाची? शिवसेनेवर वर्चस्व कोणाचे? शिवसेने अंतर्गत असलेल्या संघटना कोणाच्या? या विषयावर वाद अजूनही सुरुच आहे. या सर्वांवर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठाकडून वर्चस्व मिळवण्याचे प्रयत्न सुरुच असतात. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व असणाऱ्या संघटनेसाठी मोठा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. शिवसेनेच्या एयरपोर्ट एव्हिएशन कर्मचारी संघटनेच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी घेतला हा निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठा पक्षाला आणखी एक धक्का दिला आहे. मुंबई विमानतळावरील भारतीय कामगार सेना युनियनवर शिवसेना उबाठाचे वर्चस्व आहे. ते वर्चस्व मोडून काढण्यासाठी सूत्र एकनाथ शिंदे यांनी हातात घेतली आहे. त्यासाठी शिवसेनेच्या एयरपोर्ट एव्हिएशन कर्मचारी संघटनेच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार ४ हजारांवरुन थेट ८ हजार ६०० केले आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु आहे.
यांना होणार फायदा
मुंबई विमानतळावर अंतर्गत स्टाफ म्हणून काम करणारे सफाई कामगार, चालक, कार्गो लोडर आणि लिफ्ट ऑपरेटर यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. युनियन अध्यक्ष कुणाल सरमळकर यांच्या नेत्तृत्वात या कर्मचाऱ्यांची ३ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली. त्यासंदर्भात करार करण्यात आला. आता या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५८०० रूपयांचा वाढीव भत्ता, २८०० चा डीए असे एकूण ८६०० रुपये पगारवाढ दिली आहे.
कर्मचाऱ्यांना हे फायदे मिळणार
विमानतळावरील कर्मचाऱ्यांना २०२१ ते २०२७ पर्यंत एकूण १६ हजार ८०० चा वाढीव भत्ता त्याचसोबत ५ लाखांचा आरोग्य विमा अशा विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. एअरपोर्ट एव्हिएशन कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस कुणाल सरमळकर यांच्या माध्यमातून नेहमीच कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवले जातात, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले.