मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवार यांचे जेवणाचे निमंत्रण, तिन्ही मंत्री निमंत्रण स्वीकारणार का ?

बारामती : येत्या शनिवारी बारामतीत नमो रोजगार मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री हजार असणार आहेत.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच बारामतीत एवढ्या मोठ्या शासकीय कार्यक्रमाचे आयोन करण्यात आले आहे. बारामतीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी फोन करून त्यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण दिलं आहे.

बारामतीला जेव्हा कुणीही येतं त्यावेळी शरद पवार हे आवर्जून त्यांना घरी बोलावतात, अथिती देवो भवः ही आमची संस्कृती असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. राज्याचे मुख्यमंत्री जर बारामतीला येत असतील तर त्यांना बोलावणे ही आमची संस्कृती असल्याचंही त्या म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विनंतीवरून येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशरद पवारांचे निमंत्रण स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान या कार्क्रमाचं निमंत्र अजूनही शरद पवार यांना मिळालेलं नाही. पण त्यांच्याच गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे यांना मात्र निमंत्रण मिळालेलं आहे.