मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला वेग; २५ हजार रोजगारांची होणार निर्मिती

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी जवळपास नऊ हजार मेगावॉट सौरऊर्जेसाठी ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ प्रदान करण्यात आले. या माध्यमातून ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्यातून २५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. पुढच्या वर्षी ४० टक्के कृषीफिडर सौरऊर्जे वर येणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी २०१६ मध्ये फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना सुरू केली होती.

त्यानंतरच्या काळात २००० मेगावॉटपर्यंत निर्मिती करण्यात आली. आता ९००० मेगावॉट सौरऊर्जा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे ४० टक्के कृषीफिडर हे सौरऊर्जेवर येतील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. ११ महिन्यांत नऊ हजार मेगावॉटची विक्रमी निर्मिती राज्यात ३६०० मेगॅवॉट ऊर्जा क्षमता आतापर्यंत स्थापित आहे. आता अवघ्या ११ महिन्यांत नऊ हजार मेगॅवॉटची प्रक्रिया राबवून सरकारने एक नवा विक्रम घडविला आहे.