मुलतानी माती सौंदर्यासाठी वरदान, वाचा सविस्तर..

तरुण भारत लाइव्ह । ४ जानेवारी २०२३। सुंदर दिसणं कोणाला आवडत नाही. प्रत्येकाची इच्छा असते की, आपण सुंदर दिसावं. पण वाढत्या जीवनशैलीमुळे आरोग्यासह आपल्या त्वचेवर देखील परिणाम होत असतो. आपल्या चेहऱ्यावर पिंपल होत असतात. कामाच्या टेन्शन मुळे डोळ्याखाली काळे वर्तुळं येतात. पिंपल फुटल्यावर त्याचे डाग पडतात. त्यामुळे आपला चेहऱ्याची चमक निघून जाते. या सगळ्या समस्यावर आपण नैसर्गिक पद्धतीने उपचार केल्यास त्याचे तुमच्या चेहऱ्यावर विपरीत परिणाम होत नाही. तुम्हाला माहित आहे का? मुलतानी माती सौंदर्यासाठी वरदान आहे, जाणून घेऊया मुलतानी मातीचे फायदे.

मुलतानी माती त्वचा उजळविण्यास आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरते. तुमच्या चेहऱ्यावर जर सतत मुरूम येत असल्यास तुम्ही हळद आणि मुलतानी मातीची पेस्ट बनवून लावू शकता. हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा मुलतानी माती मध्ये चिमूटभर हळद घालून त्यात थोडे गुलाबपाणी टाकून हे मिश्रण बनवा. आणि पंधरा मिनिटे चेहऱ्याला लावून चेहरा थंड पाण्याने धुवा. तुम्हाला लगेच चेहऱ्यामध्ये फरक जाणवू लागेल.

तुमचा चेहरा जर तेलकट झाला असेल तर तुम्ही मुलतानी माती मध्ये गुलाबपाणी घालून हे फेसपॅक २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवून थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या! हळूहळू तुमचा तेलकटपणा कमी होईल. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता. तुमची त्वचा जर कोरडी झाली असेल तर तुम्ही मुलतानी माती मध्ये टॉमॅटोचा रस घालून हे फेसपॅक अर्धातास चेहऱ्यावर लावून कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकतात.

मुलतानी माती आणि दुधाचा फेसपॅक त्वचेवरील टॅनिंग काढून टाकण्यास उपयुक्त ठरतो. यासाठी तुम्हाला मुलतानी मातीमध्ये दोन चमचे दूध घालून हे फेसपॅक तयार करावे लागेल. हे फेसपॅक तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा लावल्यास तुम्हाला फरक लवकर दिसून येईल.