यावल : शहरातील बाबूजीपुऱ्यात प्रेमविवाहाच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाली. याप्रकरणी यावल पोलिसात १४ जणांविरोधात परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.मुलीला भेटताना वाद यावल शहरात बाबूजीपुरा भागातील चौकात चंदुलाल पंडित वानखेडे हे राहतात. त्यांच्या मुलासोबत प्रेमविवाह करण्याकरिता एक तरुणी त्यांच्या घरी आली होती. शनिवारी प्रेमविवाह करण्यास आलेल्या या मुलीच्या कुटुंबाकडील लोक त्यांच्या घरी आले व आम्हाला मुलीला भेटायचे आहे व तिला घेऊन पोलिसात जायचे आहे, असे सांगत त्यांनी वाद घातला आणि दोन्ही गटात हाणामाऱ्या झाल्या. यात ३८ वर्षीय महिलेच्या डोक्याला दुखापत झाली.
याप्रकरणी यावल पोलिसात चंदुलाल पंडित वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील सीताराम भोई, रेखा सुनील भोई (दोघे राहणार भुसावळ), लता सुरेश नंदाने, दिलीप सुरेश भोई, विनोद रामा मोरे (तिघे राहणार उल्हासनगर) व गिरीश भोई (पाडळसे. ता.यावल) या सहा जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दुसन्या गटातर्फे तक्रार दुसऱ्या गटाकडून रेखा सुनील भोई (३८) या जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चंदुलाल पंडित वानखेडे, विशाल चंदुलाल भोई, मोहन चंदुलाल भोई, लोकेश अशोक भोई,रोहित अशोक भोई, कोमल सुनील भोई, माधुरी विशाल भोई व सुमनबाई चंदुलाल भोई (सर्व राहणार यावल) या आठ जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन फिर्यादीवरून तब्बल १४ जणाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेंद्र पवार करीत आहे. या दंगलीतील सर्व संशयीत हे यावल शहरातील बुरूज चौकात येऊन आपसात हाणामारी करतांना पोलिसांना दिसताच पोलिसांनी सार्वजनिक शांतता भंग व सार्वजनिक ठिकाणी आरडा-ओरड केल्याप्रकरणी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.